कुडाळ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम !

जिव्हाळा सेवाश्रमास 'मदतीचा हात' !
Edited by: ब्युरो
Published on: January 25, 2024 08:23 AM
views 162  views

कुडाळ : कुडाळ ज्युनिअर कॉलेजच्या बारावी सायन्स बीच्या विद्यार्थ्यांनी सुरेश बिर्जे यांच्या जिव्हाळा सेवाश्रमास भेट देऊन वस्तू, शालेय साहित्य आणि खेळाचे साहित्य तसेच आर्थिक रूपाने आज मदत केली. वर्गशिक्षक साई वेंगुर्लेकर यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांनी हा संकल्प आज तडीस नेला.

राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठा दिवस आमच्या विद्यार्थ्यांनी असा सार्थकी लावला. आश्रमाचे सर्वेसर्वा सुरेश बिर्जे यांनी आपल्या विद्यार्थ्यांना आणि आपल्या प्रशालेला या निमित्ताने कृतज्ञपूर्वक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना या वयात सामाजिक भान असणं ही फार मोठी गोष्ट आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे देताना हे असे संस्काराचे पाठ आमची प्रशाला नेहमीच देते हे यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. विद्यार्थ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे