बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये ड्रग्स मुक्त सिंधुदुर्ग विषयावर समीर वानखेडे यांची प्रकट मुलाखत

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 21, 2026 19:04 PM
views 36  views

कुडाळ : येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, सिंधुदुर्ग, साईनाथ जळवी फिल्म,आणि तरुण भारत संवाद यांच्या संयुक्त विद्यमाने   *एकच ध्येय ड्रग्स मुक्त सिंधुदुर्ग* या संदर्भात वरिष्ठ IRS अधिकारी समिर वानखेडे, अतिरिक्त आयुक्त चेन्नई यांच्या गुरुवार दि. 23 एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत  बॅ. नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ मध्ये या विशेष मुलाखतिचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध पत्रकार शेखर सामंत हे यांची मुलाखत घेणार आहेत.

आजची तरुण पिढी विविध प्रलोभनाच्या आहारी जाऊन ड्रगच्या विळख्यात सापडून बरबाद होत आहेत. स्वतःच जीवन, कुटुंब, घर, संसार, समाज व्यवस्था यामुळे हतबल झालेली आहे.  सामाजिक नीतिमूल्य उध्वस्त होण्याच्या स्थितीमध्ये आहे. यासाठी नागरिकांमध्ये सामाजिक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने  हा 'एकच ध्येय ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग'  कार्यक्रम सकाळी 10.00 ते 12.00या वेळेत बॅ.नाथ  पै शिक्षण संस्थेमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व आयोजकांतर्फे करण्यात आलेले आहे.