
कुडाळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून कुडाळ शहरात भव्य ‘विशाल हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. रविवार, १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ८ या वेळेत कुडाळ येथील मराठा समाज सभागृह येथे हा सोहळा संपन्न होणार आहे. या संमेलनात डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे बौद्धिक सत्र आयोजित करण्यात आले आहे.
विविध स्पर्धा: वक्तृत्व स्पर्धा, वेषभूषा स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा.
आरोग्य सेवा: भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.
आकर्षण: तरुणाईसाठी विशेष 'सेल्फी पॉईंट'.
पंचपरिवर्तन संकल्पना: पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्वच्छताबोध आणि नागरिक कर्तव्य या मूल्यांचा प्रसार करण्यात येणार आहे.
या भव्य कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष समिती कार्यरत असून त्यांची पदे खालीलप्रमाणे आहेत:
संयोजक सम्राट (तुळसीदास) कुडतरकर
कोषाध्यक्ष वामन (दादू) म्हापणकर
सहसंयोजक राहुल (पप्पू) पाटणकर
यासाठी गोपाळ (महेश) राऊळ, डॉ. जय राऊळ, उदय कुडाळकर, अॅड. अमोल मालवणकर, शेखर (बंड्या) केळबाईकर, संजय पिंगुळकर, ओंकार ओटवणेकर, महेंद्र बांदेकर आणि विवेक पंडित हे विशेष परिश्रम घेत आहेत. कुडाळ आणि परिसरातील सर्व नागरिकांनी या हिंदू संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित रहाव असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.










