
देवगड : रत्नागिरी - सिंधुदुर्गचे खासदार तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त पंचायत समिती देवगड येथे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती देवगड यांच्या अंतर्गत १० टक्के महिला व बालकल्याण, २० टक्के समाजकल्याण तसेच ५ टक्के दिव्यांग निधीतून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या मंजूर लाभार्थ्यांना योजनांचे मंजुरी आदेश वितरण पंचायत समिती देवगडचे सभापती गणेश राणे तसेच उपसभापती अमोल लोके यांच्या हस्ते लाभार्थ्यांना करण्यात आले.
यावेळी उपस्थित सभापती पंचायत देवगड गणेश राणे यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमाला कृषी अधिकारी दिगंबर खराडे , बाल विकास प्रकल्प अधिकारी कौमुदी रसाळ ,कक्ष अधिकारी संतोष बिर्जे ,अधिक्षक कुणाल मांजरेकर , विस्तार अधिकारी ( ग्रा.प ) दिपक तेंडुलकर , विस्तार अधिकारी समिर होडावडेकर, कनिष्ठ सहाय्यक दिपक मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार कृषी अधिकारी दिगंबर खराडे यांनी मानले









