
कुडाळ : कुडाळ–मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदारसंघातील विविध भागांत बुथनिहाय भेटी देत मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या समवेत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुडाळ विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पहिल्यांदाच होत असून, या निवडणुकीकडे राजकीयदृष्ट्या विशेष लक्ष लागले आहे. या निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांनी मतदारसंघनिहाय उमेदवार उभे करत संघटनात्मक लढा उभारण्याचा व निलेश राणे यांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला खरा. मात्र आमदार निलेश राणे त्यांनी त्यांच आव्हान सपशेल मोडीत काढण्यासाठी कंबर कसली असून विरोधकांनी “मतदानाच्या आधीच विरोधकांनी गुडघे टेकले असून, जिल्हा परिषद व पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार,” असा ठाम दावा केला आहे.










