वैभव नाईक यांचा मालवण - कुडाळमध्ये बुथनिहाय आढावा

महायुतीविरोधात देतायत कडवे आव्हान
Edited by:
Published on: February 07, 2026 16:44 PM
views 97  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी शनिवारी मतदान होत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण व कुडाळ तालुक्यातील विविध गावांतील शिवसेना बुथना भेटी देत मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान त्यांच्यासमवेत शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुडाळ तालुक्यात एकाही जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची जागा बिनविरोध झालेली नसून, सर्व जागांवर उबाठा शिवसेनेकडून महायुतीला जोरदार टक्कर दिली जात आहे.

माजी आमदार वैभव नाईक यांच्यासाठी ही निवडणूक राजकीय अस्तित्वाची निर्णायक लढाई मानली जात असून, महायुती व विद्यमान आमदार निलेश राणे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करण्यासाठी नाईक यांनी प्रत्येक मतदारसंघात संघटनात्मक लढा उभारल्याचे चित्र दिसत आहे. सर्वच  मतदार संघात दिलेले उमेदवार त्यानंतर ठेवलेला बुथनिहाय संपर्क, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मतदारांचा प्रतिसाद यामुळे कुडाळ–मालवण परिसरातील ही निवडणूक चुरशीची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.