कुडाळमध्ये सुरुवातीच्या दोन तासांत ९% मतदान

दुपारनंतर जोर वाढण्याची शक्यता
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: February 07, 2026 10:10 AM
views 51  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९ गटांसाठी आणि पंचायत समितीच्या १८ गणांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील एकूण १५३ बूथवर मतदान प्रक्रिया राबवली जात असून, सकाळी ७:३० ते ९:३० या पहिल्या दोन तासांच्या सत्रात ९% मतदान झाल्याची नोंद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सत्रात मतदानाची गती काहीशी संथ पाहायला मिळाली. बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा अद्याप दिसलेल्या नाहीत. शेतीची कामे आणि सकाळची घरगुती कामे यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात मतदानाचा टक्का कमी राहिल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील सर्व १५३ मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, आतापर्यंत कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि सुरळीत पार पडत आहे. सध्या मतदान केंद्रांवर गर्दी कमी असली, तरी दुपारच्या सत्रात आणि संध्याकाळी मतदानाचा वेग वाढण्याची आशा उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.