दापोली नगराध्यक्षपदी कृपा घाग यांची निवड

Edited by: मनोज पवार
Published on: May 28, 2025 19:10 PM
views 117  views

दापोली : नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या कृपा घाग यांची एकमताने निवड करण्यात आली. आज तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा दापोली नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेच्या ठाम नेतृत्वाखाली आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे ही निवड शक्य झाली आहे. कृपा घाग या समाजाभिमुख, कर्तबगार व सजग नेत्या म्हणून परिचित असून, दापोलीच्या सर्वांगीण विकासासाठी त्या कटिबद्ध राहतील, असा विश्वास नागरिकांमध्ये आहे.

दापोलीत जनतेच्या मनात शिवसेनेबद्दल असलेला विश्वास आज पुन्हा अधोरेखित झाला आहे. तसेच महायुतीवर असलेला विश्वास ही पुन्हा एकदा या निमित्ताने दिसून आला. यामुळे जनतेच्या आशा-आकांक्षांना न्याय देणारा, पारदर्शक आणि विकासाभिमुख कारभार सुरु राहील. दापोलीच्या जनतेनं महायुतीवर दाखवलेला विश्वास नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून आज प्रत्यक्षात उतरलेला आहे.

कृपा घाग यांनी जनतेच्या हितासाठी सकारात्मक, पारदर्शक आणि विकासाभिमुख कारभार करणार असल्याचे या वेळी सांगितले, दापोलीचा सर्वांगीण विकास हेच आपले प्रमुख ध्येय राहील, असा निर्धार त्यांनी या वेळी व्यक्त केला.