

सावंतवाडी : कोकणसाद LIVE व दै. कोकणसाद आयोजित विल्बर्ट प्राॅपर्टीज प्रायोजित व कॅमलीन सहप्रायोजित 'खेळ पैठणी'चा कार्यक्रम सावंतवाडी माठेवाडा नवरात्रोत्सव मित्रमंडळ येथे आयोजित करण्यात आला होता. यात नव्या निलेश पेडणेकर या विजेत्या ठरल्या. अर्चना फाउंडेशन पुरस्कृत पैठणीन मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. तर हृदया ओंकार सरनाईक व सौ.देवयानी देवेंद्र टेमकर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकांच्या मानकरी ठरल्या. या दोघींना सुप्रसिद्ध एस.एम.मडकईकर ज्वेलर्स पुरस्कृत चांदीच नाण व चांदीची लक्ष्मीची मूर्ती देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमास महिलांसह आबालवृद्धांनी भरभरून प्रतिसाद दिला.
सावंतवाडी शहरातील आत्मेश्वर मंदिर येथील माठेवाडा नवरात्रोत्सव मंडळाच्या मंडपात हा खेळ पैठणीचा रंगला होता. या त विविध भागातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी अर्चना घारेंनी कोकणातील नंबर वन चॅनल कोकणसादन महिलांसाठी राबविलेल्या या उपक्रमाच कौतुक केले. त्या म्हणाल्या केवळ बातम्या न देता सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम कोकणसाद राबवत. नवरात्रोत्सवात महिलांचा उत्साह द्विगुणित करण्याच काम टीम कोकणसाद केल असे गौरवोद्गार काढत विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. तर जिल्ह्यात या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मध्यरात्र होत आली तरी सावंतवाडीतील महिलांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. स्त्री शक्तीचा जागर असाच पुढे चालत राहू दे अशी भावना कोकणसाद LIVEच्या संपादीका देवयानी वरसकर यांनी व्यक्त केली. याप्रसंगी व्यासपीठावर दै.कोकणसादचे संपादक संदीप देसाई, एस.एम. मडकईकर ज्वेलर्सच्या सौ. वैष्णवी मडकईकर, अर्चना फाउंडेशनच्या सौ. पूजा दळवी, युवा उद्योजक विराग मडकईकर, सामाजिक कार्यकर्ते देव्या सुर्याजी, मंडळाचे अध्यक्ष नंदू गावडे, मंडळाचे सदस्य पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, गुरूप्रसाद चिटणीस, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, बबलू मिशाळ, दिलीप सांगावकर आदी उपस्थित होते.
शुभारंभानंतर मुख्य आकर्षण खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचा थरार रंगला. यात महिल उत्फुर्तपणे सहभागी झाल्या होत्या. तीन फेऱ्यांमध्ये चालेल्या या खेळात नव्या पेडणेकर यांनी बाजी मारली. दोन व तीन नंबरसाठी दोन स्पर्धकांचे समसमान गुण झाल्यामुळे आणखी एक खेळ घेण्यात आल्या. त्यामध्ये सौ. हृदया सरनाईक ह्या व्दितीय व सौ. देवयानी टेमकर या यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर न बोलता, न ऐकू येणाऱ्या सौ.पुजा साटविलकर खेळ पैठणीत सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या या जिद्दीला दाद देत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.रात्री उशीरापर्यंत हा कार्यक्रम चालला. मात्र, महिलांच्या उत्साहात तसुभरही कमी नव्हती. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले. तसेच हा कार्यक्रम थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयटी हेड विद्येश धुरी,कॅमेरामन प्रसाद कदम ,साहील बागवे, अनिकेत नार्वेकर यांनी काम केले. या कार्यक्रमाचे आभार सावंतवाडी प्रतिनिधी विनायक गांवस यांनी मानले.