
देवगड : भाजपा नगरसेवकांनी देवगड जामसंडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज कांबळे यांची भेट घेतली असून देवगड किल्ला परिसरात गढूळ पाणीपुरवठा होतो व याचा जाब विचारण्यासाठी भाजपा नगरसेवकांनी आज देवगड जामसंडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज कांबळे यांची भेट घेतली.
यावेळी होणारा हा पाणीपुरवठा सुरुवातीचा असल्याने गढूळ होत असून पहिले दहा मिनिटे पाणी न वापरता सोडून द्यावे व नंतर पाणी वापरात घ्यावे येणारे पाणी शुद्ध करून वापरावे तसेच या भागाला जादा पाणीपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन व सल्ला कांबळे यांनी दिला.
यावेळी देवगड जामसंडे नगरपंचायतीचे गटनेते शरद ठुकरूल यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका व माजी नगराध्यक्ष प्रणाली माने, तन्वी चांदोस्कर, महिला तालुकाध्यक्ष उषःकला केळुसकर, व्ही. सी खडपकर यांच्यासह अन्य नगरसेवक व किल्ला भागातील नागरिकांनी देखील या विषयी भेट घेउन चर्चा केली.
दहिबाव येथील पाणी पुरवठा हा केवळ पंधरा दिवस पुरेल एवढेच पाणी साठा शिल्लक असून यामुळे गढूळ पाणी येत आहे. पाणीपुरवठ्याची विहीर व गॅलरी यांची कामे अद्यापही पेंडिंग असून ती करणे बाकी आहेत .यामुळे अशाच प्रकारे गढूळ पाणीपुरवठा शहराला करावा लागत आहे. पाडाघर योजनेतील पाणी चोरण्याचे प्रकार वाढले असून गस्त घालून ते वॉल बंद करण्याचे काम सुरू आहे.तरीही पाणी कमी पडत असून सध्या शहराला दोन दिवस आड पाणी देणे शक्य आहे. सातपायरी पासून पुढे असणाऱ्या सर्व लाईन मध्ये सांडपाणी मिक्स होत असल्याची धक्कादायक कबुली देवगड जामसंडे नगरपंचायत प्रशासनाने दिली आहे.
यामुळे देवगडकरांना होणारा पाणीपुरवठा हा अशुद्ध असल्याचा आरोप भाजपा नगरसेवकांनी केला. मात्र गढूळ पाणी न पुरवतात शुद्ध पाणी पुरवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी सुरज कांबळे यांनी या वेळी दिले आहे .