
रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य सस्था निवडणुकीसाठी आज महायुतीतर्फे अनिकेत सुनिल तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने उद्यापासून निवडणूकीच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे.
यावेळी खासदार सुनील तटकरे, मंत्री उदय सामंत, मंत्री आदिती तटकरे, मंत्री नितेश राणे,आमदार दीपक केसरकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रमोद जठार, आमदार शेखर निकम, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र थोरवे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांसह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.










