सिधुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या १० रेल्वे स्टेशनवर प्रवाशाचा तिकीट कोटा सह प्रवाशांच्या सोयीसुविधा पुरविण्या बाबत जाणीवपूर्वक मेंढरांसारखा प्रवास समस्या बाबत अन्याय होत असून जलद गाड्या थांबे , तिकीट कोठा , रस्ते आणि स्टेशन प्लॅटफॉर्म वविविध समस्यांबाबत केंद्र सरकार च्या रेल्वेचे स्थायी समिती सभेत लक्षवेधकासाठी सदस्य तथा खासदार अमोल कोल्हे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. यावर याप्रश्नी रेल्वे मंत्रालयाच्या नवीन स्टॅन्डीग कमीटीच्या पहिल्या सभेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १० ही रेल्वे स्टेशन चा प्रश्न प्राधान्याने घेऊन तात्काळ सोडविण्या साठी पुढाकार घेणार असे आश्वासन दिले.
कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती, सिंधुदुर्ग या संस्थेच्या माध्यमातून खासदार अमोल कोल्हे यांचे लक्ष वेधले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश पावसकर सचिव अजय मयेकर , जिल्हा समन्वयक नंदन वेगुर्लेकर , संदीप सातार्डेकर , स्वप्नील गावडे , सिधुदूर्ग स्टेशन अध्यक्ष शुभम परब , संजय वालावलकर आदींसह उपस्थित होते
यावेळी दिलेल्या निवेदनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण, वैभववाडी, आचिर्णे, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी, मडूरा यासर्व १० रेल्वे स्टेशन वरील प्रवाश्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी मागील ३ वर्षापासून कार्यरत आहोत. परंतु सीएमडी बेलापुर आणि आरआरएम रत्नागिरी यांच्याशी सतत पत्रव्यवहार करूनही तसेच दिनांक १५ ऑगस्टला एक दिवसिय लाक्षणिक उपोषण करूनही कोणताही चांगला बदल किंवा होत असलेल्या त्रासात सुतभरही सुधारणा झालेली नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या प्रमुख स्टेशन मध्ये सिंधुदुर्ग हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण आहे. सिंधुदुर्ग स्टेशन वर यापूर्वी तिकीट कोटा सिस्टिम होती ती पुन्हा सुरु करावी किवा पी आर एस सिस्टिम सुरु करावी. नेहमी जाता येता सिंधुदुर्ग स्टेशनवर २०दिवस क्रॉसिंग होणारी नेत्रावती लोकमान्य टिळक , तसेच जनशताब्दी या रेल्वेना कायम थांबा मिळावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही न थांबता जाणाऱ्या जलद गाड्या मध्ये मरुसागर जामनगर तसेच एन झेड एम अर्नाकुलमएक्सप्रेस या सह प्रमुख गाड्यांना सिंधुदुर्ग स्टेशन वर थांबा मिळावा. तसेच वैभववाडी पीबी आर कोचीवली , जी एल एम बी हमसफर एक्सप्रेस , कणकवली स्टेशन ला गोवा संपर्क क्रांति , जामटेन एक्सप्रेस , याचप्रमाणे कुडाळ स्टेशनला केरळाक्रांती , एलटीटी , इआरएस , दुरंतो आणि सावंतवाडी येथे वायएन आर के कोचीवली, एनझेडएम दुरंतो एक्सप्रेस या रेल्वेना थांबा मिळावा. जिल्हा मुख्यालय ठिकाण असल्याने जिल्हाधिकारी, सह प्रमुख अधिकारी न्यायाधीश व अन्य कर्मचारी अधिकारी प्रवाशांना सोयीचे होणार आहे. पर्यटन आणि मेडिकल टुरिझम कडे केंद्र शासनाने लक्ष दिला आहे. येणारे पर्यटकांना सोयी सुविधा साठी सिंधुदुर्ग स्टेशन महत्वाचे असून या स्टेशननजीक एस एस पी एम हॉस्पिटल, शासकीय मेडिकल कॉलेज (सिंधुदुर्ग) याशिवाय कृषीकॉलेज लॉ कॉलेज मध्ये येणारे परजिल्ह्यातील विद्यार्थी यांना थांबा सोयीचा ठरणार आहे. तसेच टुरिझम इकॉनॉमी दृष्टीने, मालवण पर्यटन ठिकाणच्या दृष्टीने सिंधुदुर्ग स्टेशन महत्वाचे आहे.
तसेच दिवा रत्नागिरी मडगाव ही लोकल गाडी कोरोना नंतर बंद झाली आहे. तिची रत्नागिरी येथून रात्री २ ऐवजी ४वाजता सुटल्यास वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी, मडुरा येथून नियमित गोव्यात रोजी रोटी, आरोग्य सेवा व भाजी पाला विक्री साठी जाणाऱ्या प्रवाशांना सोयीचे ठरणार आहे. तरी या बाबत विचार व्हावा.अशी मागणी केली आहे .
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्टेशन अप्प्रोच रोड दुरुस्ती करणे, फ्लायओवर ( एफओ बी), सीसीटीव्हीकॅमेरे बसविणे, डिजिटल बोर्ड, प्लॅटफॉर्म, निवारा शेड या सुविधा उपलब्ध करणे. पिण्याच्या पाण्याची पाणपोई दुरुस्ती करणे. स्वच्छता गृह दुरुस्ती करणे.
तरी आपण सदस्य स्थायी समिती रेल्वे मंत्रालय भारत सरकार या नात्याने आमच्या जिल्ह्यातील सर्व मागणी पुढील स्थायी समिती सभेत मांडून आम्हाला न्याय मिळवून द्यावाअशी मागणी केली आहे काय म्हटलं आता यावर कोल्हे म्हणाले लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोकण रेल्वेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संयुक्तपाणी दौरा करणार असे आश्वासन दिले आहे.