
कुडाळ : कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष आणि समन्वय समिती, सिंधुदुर्ग या अराजकीय संघटनेची तातडीची सभा रविवार दिनांक 14 जानेवारी रोजी दुपारी 3 ते 5 यावेळेत ग्रामपंचायत हॉल, रानबांबुळी, कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी सभेत खारेपाटण, वैभववाडी, आचिर्णे, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मडुरा या सर्व रेल्वे स्टेशन वरील अडीअडचणी बाबत चर्चा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्रवासी संघटनांची नवीन जिल्हास्तरीय समन्वय समिती गठीत करण्यात येणार आहे.असे आवाहन नंदन वेंगुर्लेकर, सरपंच, रानबांबुळी परशूराम परब,. कसाल सरपंच राजन परब यांनी केले आहे.