कोकण रेल्वे प्रवासी संघटना आंदोलनावर ठाम !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 13, 2024 10:31 AM
views 272  views

सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचं रखडलेलं काम त्वरित पूर्ण करावं, सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामकरण कोकण रेल्वेचे शिल्पकार 'प्रा. मधू दंडवते' करावं आणि कोकण रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या कोरोनात बंद केलेल्या गाड्यांना सावंतवाडी येथे थांबा द्यावा या कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रमुख मागण्या आहे. आजपर्यंत फक्त आश्वासनं देण्यापलीकडे कोणती ठोस कृती कोकण रेल्वेकडून व शासनाकडून झाली नसल्यामुळे येत्या प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला एक दिवशीय आंदोलन करण्यात येणार आहे. यावर आम्ही ठाम असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे अध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर यांनी सावंतवाडी दिली.


ते म्हणाले, 26 जानेवारी पर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास व लेखा आश्वासन न दिल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल. त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या आंदोलनात कोकणातील एकूण 23 संघटना सहभागी होणार असून सावंतवाडी रेल्वे स्टेशन पंचक्रोशीतील विविध ग्रामपंचायतींनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. इतर सर्व सामाजिक संघटना देखील या आंदोलनात सहभागी होतील अशी माहिती अँड. निंबाळकर यांनी दिली. 


तर याबाबत आजवर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच लक्ष वेधलं आहे.या मतदारसंघाचे स्थानिक आमदार व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याविषयी रेल्वेमंत्री यांची भेट घेऊन सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला प्रा. मधु दंडवते यांचे नाव देता येणार नाही, तशी प्रथा नाही, असे रेल्वे मंत्री म्हणाल्याचे सांगितले. तर रेल्वे टर्मिनसच्या कामासाठी लवकरात निधी प्राप्त करून दिला जाईल. लांब पल्ल्याच्या तीन गाड्यांना सावंतवाडी येथे थांबा दिला आहे असे प्रसार माध्यमातून सांगितले. मात्र, या

याबाबत कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस या नावांच्या धर्तीवर माजी रेल्वेमंत्री व कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी टर्मिनसला द्यायला काय हरकत आहे ? असा सवाल अॅड. निंबाळकर यांनी केला. दीपक केसरकर हे निवडणुकीच्या तोंडावर अशा घोषणा करून त्याचा निवडणुकीत फायदा घेऊ पाहत आहेत. 2019 साली निवडणूकी

पूर्वी सावंतवाडी येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर झाल्याचे त्यांनी जाहीर केले. त्याचे उद्घाटन ही केले. मात्र, आजपर्यंत त्या कामावर एक पैसाही खर्च झालेला नाही. त्याचप्रमाणे आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत अशा प्रकारच्या घोषणा होत आहे. त्यामुळे लेखी आश्वासन देण आवश्यक आहे. तर टर्मिनसच्या कामाला निधीची आवश्यकता आहे तो देण आवश्यक असल्याचं  अॅड. निंबाळकर म्हणाले. 


तर येत्या २६ जानेवारीला कोकण पट्ट्यातील रेल्वे संघटना देखील सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठीच्या लढ्यात सहभागी होणार आहेत. या लढ्याला आता मोठं स्वरूप आलं आहे. सावंतवाडीच्या हक्काच्या गाड्या व रखडलेलं रेल्वे टर्मिनस हे आम्हाला मिळाव हाच मुळ उद्देश आहे. त्यासाठी हा तीव्र लढा उभारला असल्याचं सचिव मिहीर मठकर यांनी सांगितले. याप्रसंगी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सचिव मिहीर मठकर, रमेश बोंद्रे, पुंडलिक दळवी, अँड. सायली दुभाषी, विलास जाधव, उमाकांत वारंग, सुरेश भोगटे, उमेश कोरगावकर, सिद्धेश सावंत, भुषण बांदिवडेकर, नंदू तारी आदी उपस्थित होते.