
सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा ११ जून रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी जिमखाना मैदानाजवळील बॅडमिंटन हॉल इमारतीत आयोजित करण्यात आली आहे.
या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा होऊन नवीन कार्यकारिणी निवडीवर चर्चा केली जाणार आहे. या सभेला जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के व केंद्रीय कार्यकारिणी सदस्या उषा परब, सचिव विठ्ठल कदम, खजिनदार भरत गावडे आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सर्व सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सावंतवाडी कोमसाप शाखा अध्यक्ष अॅड. संतोष सावंत, सचिव प्रतिभा चव्हाण, खजिनदार डॉ. दीपक तुपकर यांनी केले आहे.