
सिंधुदुर्ग : कोकण विभागीय मंडळांतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात परीक्षेपूर्वी कॉपीमुक्त परीक्षेसाठी वातावरण निर्मिती करण्यात आली. शाळाप्रमुखांच्या जिल्हानिहाय ऑफलाइन बैठका, शाळास्तरावर शिक्षक पालक यांच्या संयुक्त सभा, विद्यार्थ्यांना कॉपीमुक्तीची शपथ, उत्तरपत्रिकेवरील सूचना व शिक्षासूचीचे वाचन, उत्तरपत्रिका अचूक व नेमकेपणाने कशी लिहावी, परीक्षापूर्व व परीक्षा काळात घ्यायची आरोग्य व आहाराची काळजी, तणावमुक्त पद्धतीने परीक्षेला कसे सामोरे जावे याबाबत उपक्रम राबवण्यात आले. प्राचार्य-मुख्याध्यापकांकडून वेळोवेळी ऑनलाईन बैठकाद्वारे आढावा घेण्यात आला.
राज्य मंडळांने दिलेल्या निर्देशाप्रमाणे 20 ते 26 जानेवारी या कालावधीत कॉपीमुक्त अभियान जनजागृती सप्ताह राबवण्यात आला. कोकण विभागात दरवर्षी कॉपीमुक्त अभियान जोरकसपणे राबवण्यात येते. त्याचीच प्रेरणा घेऊन इतर विभागीय मंडळामध्येही असे उपक्रम राबवण्यात आले.विद्यार्थी अभ्यासाला लागले, शाळा स्तरावर प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करून घेण्यात आला. बारावी परीक्षेचा कोकण मंडळाचा निकाल ९६.७४ टक्के इतका असून कोकण मंडळ राज्यात कॉपीमुक्तित व निकालात प्रथम क्रमांकावर असल्याचं कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळ विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं.