'कोकण कन्या' रविवारी 2 तास उशिराने सावंतवाडीत

गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल
Edited by: विनायक गांवस
Published on: August 31, 2025 20:24 PM
views 183  views

सावंतवाडी : गणेशोत्सवाच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय वाढवत कोकण रेल्वेची कोकण कन्या एक्सप्रेस रविवारी दोन तास उशिराने सावंतवाडी रेल्वे स्थानकात दाखल झाली. परिणामी शेकडो प्रवाशांना स्टेशनवर मोठा त्रास सहन करावा लागला.


दरम्यान, सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम अद्याप अपूर्ण असून प्रवाशांसाठी आवश्यक त्या शेडची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे पावसात प्रवाशांना ओलेचिंब होत उभे राहावे लागले. महिलांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनाच मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात मोठ्या प्रमाणावर प्रवासी ये-जा करत असल्याने गर्दी प्रचंड वाढली आहे. मात्र, गाड्यांचा विलंब आणि स्थानकावरील अपुऱ्या सुविधा यामुळे प्रवाशांना दुप्पट त्रास सहन करावा लागला. याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त करत कोकण रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर स्थानकावरील सुविधा पूर्ण कराव्यात व गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत ठेवावे, अशी मागणी केली आहे.