वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना कोकण आयडॉल पुरस्कार

'भूमी प्रतिष्ठान, कोकण क्लब, कोकण बिझनेस फोरम, ग्लोबल कोकण'तर्फे सन्मान
Edited by: दिपेश परब
Published on: July 18, 2023 15:10 PM
views 174  views

वेंगुर्ले : देशातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून वेंगुर्ला नगरपालिकेचा गौरव झाला. या वेंगुर्ला नगरीचे नगराध्यक्ष या नात्याने सर्वपक्षांच्या नगरसेवकांना एकत्र आणून शिस्तबध्द पध्दतीने आपल्या शहराचा टीमवर्कच्या माध्यमातून विकासात्मक कायापालट केल्याबद्दल कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण क्लब, कोकण बिझनेस फोरम, ग्लोबल कोकण या संस्थांतर्फे वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना कोकण आयडॉल सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

    कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण क्लब, कोकण बिझनेस फोरम, ग्लोबल कोकण या संस्थतर्फे "भव्य कोकण आयडॉल सन्मान सोहळा कोकण व्हिजन २०३० परिषद"  रविवार, दि. १६ जुलै रोजी  मुंबई दादर (पूर्व) हिंदू कॉलनी येथील प्राचार्य बी.एन. वैद्य सभागृहांत संपन्न झाली. यावेळी छत्रपती शिवरायांच्या परीवारातले तंजावर तामिळनाडूचे राजे श्रीमंत बाबाजी राजे भोसले, छत्रपती शिवरायांचे नौदल प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, लोकमान्य टिळक यांचे वंशज कुणाल टिळक व संस्थापक अध्यक्ष संजय यादवराव या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कोकण आयडॉलचे पुरस्कार देऊन दिलीप गिरप यांचा सन्मान करण्यात आला. या पुरस्काराबाबत त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.