
सावंतवाडी : पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आयोजित कोकण सन्मान पर्व -दुसरे 2025 पुरस्कार सोहळा काल सायंकाळी देवगड येथे पार पडला. या पुरस्काराच्या माध्यमातून कोकणातील अनेक क्रियेटर्सचा सन्मान करण्यात आला. यात सावंतवाडी तळवडे येथील मालवणी हीरोला बेस्ट फॅमिली ओरीएन्टेड रीलसाठी नामांकन मिळाले होते. चाहत्यांच्या प्रतिसादामुळे हा सन्मान त्यांना प्राप्त झाला. बिग बॉस मराठीतील डीपी अर्थात धनंजय पवार यांच्या हस्ते गणेश कुंभार व कुटुंबाला कोकण सन्मान देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मंत्री नितेश राणेंनी त्यांच्या संवाद साधला. त्यांच्या व्हिडिओचे व कामाचे कौतुक केले. कुंभार कुटुंबान आपलं सादरीकरण देखील यावेळी केले. मालवणी हिरो गणेश कुंभारसह त्यांचे आई-वडील यावेळी उपस्थित होते. कोकण, संस्कृती, परंपरा, खाद्यपदार्ध, पाककला, आपले समुद्र किनारे हे सर्व काही कोकणातील क्रिएटर्स व्हिडिओच्या माध्यमातून जगभरात पोहोचवत असतात. यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून क्रिएटर्सचा सन्मान करण्यात आला. सुत्रसंचालन कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर भगत, अभिनेता मनमित पेम यांनी केल. यावेळी अभिनेत्री वनिता खरात, श्रीमान लिजेंड, धनंजय पवार, सुमित पाटील, सुमित चव्हाण, शंतनू रांगणेकर, बिनधास्त मुलगी गौरी पवार आदींसह कोकणातील रील स्टार्स उपस्थित होते.