देवगडात ८६.४२ टक्के मतदान !

कोकण पदवीधर निवडणुक
Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 26, 2024 14:43 PM
views 71  views

देवगड : महाराष्ट्र विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होत असून. देवगड तालुक्यात चार केंद्रावर मतदान होणार आहे .या निवडणुकीसाठी देवगड तालुक्यातून १६७९ पदवीधर मतदार पैकी १४५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण ८६.४२ टक्के एवढे मतदान झाले.. या निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार म्हणून निरंजन डावखरे तर काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रमेश कीर हे निवडणूक रिंगणात आहेत.

निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या बुथवर नंबर देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. महायुतीची बुथवर माजी आम.अजित गोगटे,भाजप सरचिटणीस शरद ठूकरूल,माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर,प्रणाली माने,रेश्मा जोशी, तन्वी चांदोस्कर,भाजप शहर अध्यक्ष दयानंद पाटील,योगेश पाटकर,व अन्य भाजप पदाधिकारी सकाळ पासून ठाण,मांडून बसले होते.महाविकास आघाडीचे युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष किरण टेंबुलकर,तालुका अध्यक्ष उमेश कुलकर्णी,सुरज घाडी,युवासेना अध्यक्ष गणेश गावकर,निनाद देशपांडे,तेजस मामघाडी सजउद्दिन सोलकर,तुषार भाबल,अन्य कार्यकर्ते सक्रिय होते.या निवडणुकीसाठी एकूण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. देवगड तालुक्यात या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा ,पोलीस प्रशासन सज्ज होते .देवगड तहसीलदार संकेत यमगर,यांचे प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक अरुण देवकर ,यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनायक केसरकर,सुधीर कदम व अन्य पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.तालुक्यात चार मतदान केंद्रांवर मतदान झाले. यामध्ये देवगड तहसील कार्यालयात दोन मतदान केंद्र तर शिरगाव हायस्कूल व पडेल हायस्कूल या ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली यातील देवगड तहसील कार्यालयातील मतदान केंद्र क्रमांक १०३ या केंद्रावर पुरुष मतदार ३२२, स्त्रि मतदार २१३ असे एकूण ५३५ मतदार,होते या पैकी ४८० मतदार यांनी मतदानाचा हकक बजाविला.

मतदान केंद्र १०३ अ या केंद्रावर पुरुष मतदार ३३३ स्त्री मतदार २३० असे एकूण ५६३,मतदार होते त्यापैकी ४६१ मतदारांनी हकक बजाविला.मतदान केंद्र शिरगाव. १०४ या केंद्रावर पुरुष मतदार १५३ स्त्री मतदार ६३ असे एकूण २१६,या पैकी १८३ मतदारांनी मतदान केले केंद्र १०५ पडेल या केंद्रावर वर पुरुष मतदार २३१ तर स्त्री मतदार १३४ असे एकूण ३६५ मतदार होते त्यापैकी ३२७ मतदारांनी मतदान केले.देवगड तालुक्यातुन एकूण मतदारांपैकी पुरुष १०३९ तर स्त्रिया ६४० असे एकूण १६७९ मतदार होते त्या पैकी १४५१ मतदारांनी मतदान केले. देवगड तालुक्यात एकूण ८६.४२ टक्के एवढे मतदान झाले.