सिंधुदुर्गात दुपारपर्यंत 45 टक्के मतदान !

कोकण पदवीधर निवडणूक !
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 26, 2024 09:25 AM
views 123  views

 सिंधुदुर्गनगरी :  पदवीधर मतदार संघासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उत्स्फूर्तपणे आणि शांततेत मतदान सुरू आहे.  सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात 45 टक्के एवढे मतदान झाले आहे. 

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 18000551 एवढे मतदाना मतदार आहेत. यापैकी आतापर्यंत 8348 एवढ्या मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. तर पूर्ण कोकण पदवीधर मतदारसंघात एक वाजेपर्यंत एकूण 35 टक्के एवढे मतदान झाले आहे. यामध्ये पालघर 33.12 टक्के, ठाणे  34.66 टक्के, रायगड 35.70 टक्के, रत्नागिरी 35.39 टक्के आणि सिंधुदुर्ग 45 टक्के मतदान झालंय.