
सिंधुदुर्गनगरी : कोकण पदवीधर मतदार संघासाठी आज सकाळपासून मतदान सुरू झाले. सकाळपासून आत्तापर्यंत 3139 एवढे मतदान झाले आहे, यामध्ये 1996 पुरुष तर ११४३ स्त्रियांचा समावेश आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 18 हजार 551 एवढे मतदार असून सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील ३४ ही मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू झाले. 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील तीन हजार 139 एवढ्या मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे.