कोमसापची 'स्वरचित काव्य वाचन स्पर्धा'

Edited by: विनायक गांवस
Published on: September 09, 2025 13:31 PM
views 129  views

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडीने सावंतवाडी तालुका मर्यादित (माध्यमिक स्तर) विद्यार्थ्यांसाठी ''स्वरचित काव्य वाचन स्पर्धा'' आयोजित केली असून प्रत्येक शाळेतून एक विद्यार्थी यामध्ये सहभाग घेऊ शकणार आहे. या स्पर्धेत सर्व माध्यमिक शाळांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन कोमसाप तालुकाध्यक्ष दीपक पटेकर यांनी केले आहे.


कोकणातील साहित्याचा वारसा कायम टिकवून ठेवून नवं साहित्यिक पुढे यावेत, मुलांमध्ये लेखन वाचनाची आवड वृद्धिंगत व्हावी यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद ही स्पर्धा आयोजित करत आहे. तालुक्यातील प्रशालेतून या स्पर्धेसाठी एक नाव निवडून खाली दिलेल्या 9421237568 या मोबाईल क्रमांकावर कळविण्यात यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. स्पर्धेसाठी नियम व अटी असून वयोगट - 8 वी ते 10 वी., स्वरचित कविता व स्पर्धकांचे नाव, मोबाईल क्रमांक 9421237568 (दीपक पटेकर) या नंबरवर पाठवणे बंधनकारक राहील. निवड झालेल्या स्पर्धकांना आयोजकांकडून स्पर्धेपूर्वी 7 दिवस निवड झाल्याचा संदेश दिला जाईल. 'एका शाळेचा, एकच स्पर्धक' ग्राह्य धरण्यात येईल, 12 ते 24 ओळींची कविता बंधनकारक असेल तसेच काव्य मराठी अथवा मराठीच्या बोलीतून असावे. निवड झालेल्या स्पर्धकांना सादरीकरणासाठी 3 मिनिटांचा वेळ दिला जाईल ही स्पर्धा दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी होईल. ( स्पर्धेचे ठिकाण व वेळ निवड झालेल्या स्पर्धकांना कळविले जाईल) स्पर्धेस येण्याजाण्याचा खर्च व जबाबदारी स्पर्धक, शिक्षक वा पालकांची राहणार आहे‌. 


दरम्यान, विजेत्यांना पारितोषिके प्रथम क्रमांक - रोख रू. 500 व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक - रोख रू. 300 व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक - रोख रू. 200 व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ 2 - प्रत्येकी 100 रू. मिळणार असून सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.अधिक माहितीसाठी संपर्क दीपक पटेकर, अध्यक्ष सावंतवाडी 8446743196,राजू तावडे, सचिव, 9422584407 विनायक गांवस, सहसचिव 9075119473,सौ.मंगल नाईक-जोशी, स्पर्धा संयोजक तथा कार्यकारिणी सदस्या, कोमसाप 94058 31646 यांना साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.