कोळोशी उबाठा सरपंच गुरुनाथ आचरेकर भाजपात

आमदार नितेश राणे यांनी केले पक्षात स्वागत
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 16, 2024 09:47 AM
views 330  views

कणकवली :  लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर कणकवली तालुक्यातील कोळोशी गावचे शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे सरपंच गुरुनाथ आचरेकर यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. सरपंच गुरुनाथ आचरेकर यांचा आ. नितेश राणे यांनी भाजपात स्वागत केले. त्यामुळे शिवसेना उबाठा पक्षाला कोळोशी गावात धक्का बसला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत, तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलींद मेस्त्री, माजी जिल्हापरिषद सदस्य संजय देसाई, सुरेश सावंत, कणकवली खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, बापू फाटक ,माजी सरपंच सुशील इंदप, शैलेंद्र इंडप, चंदू शिंदे आनंद शेलार , चंद्रकांत इंदप, सुचिता पोकळे , छोटू खोत, मंगेश इंदप, हेमंत परुळेकर आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.