कोलगाव ग्रामदैवत श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव २९ रोजी

Edited by: विनायक गावस
Published on: November 24, 2023 13:59 PM
views 173  views

सावंतवाडी : कोलगाव येथील ग्रामदैवत श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव 29 नोव्हेंबर 2023 रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिराला फुलांची सजावट आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. सकाळी सातेरी देवंताची पुजा त्यानंतर श्री सातेरीची आकर्षक स्वरूपात पुष्पपुजा  दुपारी मानाचे नैवेद्य तसेच सकाळ पासून ओटी भरण्याचा कार्यक्रम व रात्रो 12 वाजता मंदिराभोवती ढोलताशांच्या गजरात  व फटाक्यांच्या आतषबाजीसह पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे व रात्री 1 वाजता पार्सेकर पारंपारीक दशावतार नाट्य मंडळाचा पौराणिक नाट्य प्रयोग होणार आहे भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सातेरी देवस्थान कमिटीच्या वतीनेच चंदन धुरी यानी केले आहे.