कोलगावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव 10 नोव्हेंबर रोजी

पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाच्या नाट्यप्रयोगाचं आयोजन
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 09, 2022 12:23 PM
views 157  views

सावंतवाडी : कोलगाव येथील ग्रामदैवत श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव 10 नोव्हेंबर रोजी मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे.  या निमित्ताने मंदिराला फुलांची सजावट तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.  सकाळी सातेरी देवतांची पूजा आणि त्यानंतर श्री सातेरीची आकर्षक स्वरूपात पुष्प पूजा,  दुपारी मानाचे नैवेद्य तसेच सकाळपासून ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू राहील.  रात्री बारा वाजता मंदिराभोवती ढोल ताशांच्या व फटाक्यांच्या आतषबाजीत पालखी मिरवणूक काढण्यात येईल.  त्याचबरोबर रात्री एक वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.  भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सातेरी देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे