कोलगाव केंद्रस्तरीय महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

Edited by: विनायक गावस
Published on: December 13, 2023 18:25 PM
views 20  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अतिशय मौलिक शैक्षणिक उपक्रम म्हणजे 'कला क्रीडा व ज्ञानी मी होणार..!' अर्थात अधिक जलद ,अधिक उंच, अधिक बुद्धिमान हे गुणवत्तेचे सकस उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र स्तर, प्रभाग स्तर, तालुकास्तर व जिल्हास्तरावर महोत्सव आयोजित करण्यात येतो. यावर्षीच्या कोलगाव केंद्रस्तरीय महोत्सवाचे उद्घाटन 12 डिसेंबर रोजी कोलगाव माध्यमिक विद्यालयाच्या भव्य मैदानावर झाले. यावेळी कोलगाव केंद्रातील दहा शाळांच्या खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत आयोजनात उत्साह भरला. 

प्रारंभी कोलगावचे केंद्रप्रमुख म. ल. देसाई व क्रीडा समितीने या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले. क्रीडा ज्योत व क्रीडा शपथ घेऊन उद्घाटन संपन्न झाले. यावेळी पालक पदाधिकारी म्हणून आंबेगाव सरपंच शिवराज परब कुणकेरी शाळा नंबर एक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजन मडवळ, कोलगाव माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ढोके मॅडम, कोलगाव केंद्र शाळा मुख्याध्यापक नरेश कारिवडेकर, कुणकेरी नंबर एक शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कदम, आंबेगाव नंबर एकचे मुख्याध्यापिका अस्मिता मुननकर, क्रीडा पंच, क्रीडा शिक्षक मिंगेल मान्येकर, नागेश गावडे, मंगेश देसाई, नितीन सावंत, श्री. मुळीक सर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेत मैदानी खेळ व समूहगीत, समूह नृत्य व 'ज्ञानी मी होणार'  या स्पर्धा उत्कृष्टरित्या संपन्न झाल्या. खेळाडूंनी आपल्या दमदार खेळाचे प्रदर्शन करत बक्षिसांची लयलूट केली.