कोलगाव भवानी मातेचा गोंधळ उत्सव मंगळवारी

Edited by: विनायक गांवस
Published on: April 29, 2024 10:23 AM
views 187  views

सावंतवाडी : कोलगाव येथील सावंत परिवारांचा श्रीदेवी भवानी मातेचा द्विवार्षिक जागरण गोंधळ उत्सव मंगळवार ३० एप्रिल व बुधवार १ मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार ३० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता सर्व संचारांना हाक मारणे व देवीचा पाटा बाहेर घेणे. सायंकाळी ७ वाजता देवीचा मांड भरणे, दिवटीवर तेल घालणे व नवस फेडणे हे कार्यक्रम होतील. रात्री ९ वाजता गोंधळी कलाकारांचा पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम आणि रात्री १०.३० वाजता आजगावकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सादर होईल.बुधवार १ मे रोजी सर्व संचारांना हाक मारून देवीचा पाटा आत घेणे, देवीची ओटी भरणे हे कार्यक्रम होतील. त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी आरती, तीर्थप्रसाद आदी कार्यक्रम होतील. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सावंत परिवारातर्फे करण्यात आले आहे.