LIVE UPDATES

माणगाव टेंबे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गर्दी

Edited by: विनायक गांवस
Published on: June 26, 2025 20:40 PM
views 136  views

माणगाव : माणगाव दत्त मंदिर येथे आज श्री प .प.वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त भाविकांनी गर्दी केली होती.

श्री दत्त मंदिर येथे अभिषेक पूजा, लघुरुद्राभिषेक, दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद तर  श्रीं चे जन्मस्थानी सकाळी अभिषेक पूजा, यतीआराधना तीर्थराजपूजा, दुपारी आरती व तीर्थप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. तसेच सकाळी ८- ३० वाजता डॉ.रवींद्र घांगुर्डे व डॉ. वंदना घागुर्डे पुणे यांचा शास्त्रीय व नाट्य संगीताचा कार्यक्रम, दुपारी ३- ३० वाजता राया कोरगावकर यांचे संवादिनी वादन त्यानंतर दिलीप ठाकूर मालवण व श्री आकाश चारी गोवा यांचा भक्ती नाट्य संगीताचा कार्यक्रम संपन्न झाला.

या उत्सवानिमित्त श्री प. प.वामननंद सरस्वती श्री क्षेत्र काशी व श्री प. प. वल्लभानंद सरस्वती श्री क्षेत्र गाणगापूर यांची प्रमुख उपस्थिती असल्याने भाविकांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. दत्त मंदिर विश्वस्त मंडळ आणि भाविक यांच्या योग्य नियोजनामुळे गर्दी असूनही सर्वांना रांगेत दर्शनासह तीर्थ प्रसाद व महाप्रसादाचा लाभ मिळाला.दत्त मंदिर येथे स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम पार पडला.