
कुडाळ : नगरपंचायत सर्वसाधारण सभा 26 जून रोजी पार पडली. सभेला नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, अरविंद नातू, गटनेते विलास कुडाळकर, संध्या तेरसे, आफरीन करोल, सृती वर्दम, उदय मांजरेकर, निलेश परब, ज्योती जळवी, नयना मांजरेकर, अँड राजीव कुडाळकर, चांदणी कांबळी, सई काळप, अक्षता खटावकर, मंदार शिरसाट उपस्थित होते.
महिला बालकल्याण तर्फे नगरपंचायत मध्ये आयोजित स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रमाबाबत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच नगरसेवक याना कोणतीच कल्पना दिली गेली नाही. राजू पठाण कर व प्रशासकीय अधिकारी यांच्यावर सर्व नगरसेवक नाराज होते. माहिती न पुरवल्याने महिला बचत गटांना या उपक्रमापासून वंचीत राहावे लागले. कोणताही उपक्रम असल्यास पूर्वसूचना देणे आवश्यक असल्याच्या नगराध्यक्षांनी सूचना दिल्या. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 2025 साठी 2.13 लक्ष निधी प्राप्त झाला आहे. नगरपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी 15 दिवस आधी नोटीस काढण्याच्या न्यायालयाने सूचना केल्या. जमिनीखालून पाईपलाईन गॅस वाहिणीसाठी 2 किलोमीटर खोदकाम व पुनर्भरणसाठी mngl ने 55 लाख भरले आहे. कुंभार वाडी, इंद्रप्रस्थ नगर, मठेवाडा यथे होणार काम.अभिमन्यू हॉटेल ते जिजामाता चौक जुनी पाईपलाईन बदलणे चा ठराव झाला. नगरपंचायत इमारत डागडुजी व रंगकाम करून सुशोभित करण्याचा ठराव मंजूत झाला.
भारतीय संविधान हे भारतासाठी पायाभूत दस्तऐवज म्हणून काम करते, जे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून त्याची चौकट स्थापित करते. याची माहिती सर्वाना होण्यासाठी घर घर संविधान मोहीम अंतर्गत 7500 घरांना फ्रेमचे वाटप केले जाणार. होणाऱ्या पावर फेल मुळे सोलर चा पर्याय श्री नातू यांनी सुचवले. नगरपंचायत कार्यक्षेत्रात 7 अधिकृत गणेश घाट आहेत. चतुर्थी पूर्वी यांची डागडुजी, रस्ते दुरुस्ती, लाईट ची सोया होणे गरजेचे आहे. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी 30 HP चा सबमर्सिबल पंप घेण्याचा ठराव मंजूर. हॉटेल RSN ते जिजामाता चौक पाण्याची जीर्ण पाईपलाईन दुरुस्ती साठी ठराव मंजुरी. दिव्यांग निधी 2025 चे 3 डिसेंबर रोजी होणार वाटप. 68 लाभार्थी ची यादी मंजूर झाली आहेत. विधवा निराधार महिलांना अर्थसाहाय्य एकूण निधी 70 लाख साठी 64 महिलांची यादी मंजूर झाली असून 6 महिला अपात्र ठरल्या आहेत. माझी वसुंधरा 6.0 अंतर्गत चांगली कामगिरी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार. मठेवाडा येथील नगरपंचायत मालकीची धोकादायक विहीर वापर पूर्ण बंद करण्याचा ठराव मंजूर. सेफ्टीटॅन्क साफ करणे व त्याची विल्हेवाट लावणे यासाठी प्रकल्प उभारणीसाठी जागा भाडेतत्त्वावर देणे किंवा खासगी प्लांट उभारणे यासाठी मंजुरी. मच्छीमार्केट मधील OWC ऑरगॅनिक वेस्ट मशीन अन्य ठिकानी हलवण्यास विरोध झाला. प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी MIDC येथील जागेत प्रकल्प उभारण्यासाठी चर्चा होताच इतर कचरा विघटन चा पर्याय काय? निलेश परब यांनी प्रश्न मांडला. प्लास्टिक बरोबर इतर कचऱ्याचा प्रश्न कधी सुटणार ? वॉर्ड मधील कचऱ्याचा मोठा त्रास होत आहे. निलेश परब आक्रमक होताच नगराध्यक्षा यांच्या हा प्रश्न अजिंठ्या वर नसल्याची माहिती दिली. यावर निलेश परब यांनी नगरसेवक यांचे ऐकून घ्यायच नसल्यास आम्हाला बोलावता कशाला ? आक्रमक भूमिका घेतली
संध्या तेरसे : बैठकीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याच क्लेकटर यांचे पत्र आले का?
कुडाळ मध्ये ग्रामपंचायत काळात 5 कोटींची पाणी योजना झाली होती ती नगर पंचायत ला हस्तांतरण झाली का ? 5 कोटी खर्चात काय काम झाले याची पुर्ण नोंद असणे आवश्यक आहे. छत्रीला वापरल्या जाणाऱ्या कापडापासून पिशव्या बनवून मच्छी मार्केटमध्ये वाटण्याच्या सूचना दिल्या. OWC मशीन आहे त्याच ठिकाणी ठेऊन काम करते का ते पाहण्याच्या सूचना दिल्या.
निलेश परब : गणेश घाट येथील स्ट्रीट लाईट काढून दुसऱ्या वॉर्डला बसवण्यात आल्याचा आरोप निलेश परब यांनी केला. पोलीस ठाणे ते RSN हॉटेल पर्यंत स्ट्रीट लाईट बसवण्यात याव्या अशी सूचना परब यांनी केली. प्रत्येक वॉर्डची रस्त्याची खड्यांची पाहणी करण्याच्या सूचना दिली.
नगराध्यक्ष बांदेकर-शिरवलकर : बैठकीची व्हिडीओ रेकॉर्डिंग चा विषय स्थायी समितीत घेऊन टेंडर काढायचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेचे noc प्राप्त असल्याची सूचना प्रशासनने दिली. कुडाळ शहरातील 40℅ पेक्षा जास्त अपंगत्व असल्यास नगरपंचायत शी संपर्क साधून नोंद करण्याचे आवाहन केले.