
तळेरे : मुंबई विद्यापीठाने मार्च-एप्रिल महिन्यात घेतलेल्या तृतीय वर्षाच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, यात विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या सहापैकी पाच विभागांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. ज्यामुळे त्यांनी गुणवत्तेची आपली उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
यावर्षीच्या निकालांमध्ये विद्यार्थिनींनी विशेष बाजी मारली असून, बीएमएस, बीएएमएमसी, बीएएफ, बीबीआय, आणि बी.कॉम या पाचही अभ्यासक्रमांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
बीएमएस विभाग
शुभम टोळवणी ७९.२२%, बीएएमएमसी विभागातून सोनाली राठोड ७८.८६%, बीएएफ विभागातून सिद्धी रानम ८०.८१%, बीबीआय विभागातून संकेत धुळप ७८.९३%
बी.कॉम विभाग
वैष्णवी लाड ७२.९८% यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच बीएस्सी-आयटी विभागाचा निकाल ८९.१८% लागला असून, यात अब्दुर रहमान खान ८०.८१% याने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व प्राध्यापक वर्ग, दळवी महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक विनायक दळवी आणि सिंधुदुर्ग उपपरिसर व दळवी महाविद्यालयाचे प्र. संचालक श्रीपाद वेलींग यांनी अभिनंदन केले असून, त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.