ठाकरे शिवसेनेचा वर्धापनदिन हुमरसमध्ये उत्साहात

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 21, 2025 14:03 PM
views 78  views

सिंधुदुर्गनगरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा हुमरस यांच्या माध्यमातून शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन हुमरस गावातील जिल्हा परिषदच्या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या आणि पेन वाटप करून साजरा करण्यात आला. 

यावेळी या कार्यक्रमासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे  शाखाप्रमुख संतोष परब, माजी हुमरस सरपंच अनुप नाईक, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश नाईक, माजी शाखा प्रमुख शेखर  देऊलकर, ज्येष्ठ शिवसैनिक विकास कुडकर, बाबू परब, सत्यवान तेली, युवा सेना शाखाप्रमुख महेश वारंग यांसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.