कोलगावात विद्यार्थ्यांप्रती 'माणूसकी'

Edited by: विनायक गांवस
Published on: June 19, 2025 15:58 PM
views 120  views

सावंतवाडी : कोलगावातील माणूसकी प्रतिष्ठानने आपल्या नावाप्रमाणेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांप्रती माणूसकी दाखवत कोलगाव व सावंतवाडी परिसरातील निवडक गरीब विद्यार्थ्यांना वह्या, छत्री, चप्पल, व दप्तर या वस्तूंचे वितरण केले. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिष्ठानचे हे शैक्षणिक कार्य सुरू आहे.    

गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहू नये. यासाठी गेली कित्येक वर्ष माणुसकी प्रतिष्ठान ही संस्था सामाजिक बांधिलकीच्या नात्याने गरीब मुलांना गरजू वस्तू तसेच शाळेसाठी लागणाऱ्या वस्तू देत आहे. मुलाना शिकायची इच्छा असते पण परिस्थिती मुले शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने माणुसकी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय वस्तु दिल्या जातात. यासाठी यावर्षी कोलगाव व परिसरातील निवडक गरीब विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. माणुसकी प्रतिष्ठानच्या या शैक्षणिक उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी या विद्यार्थ्यांच्या पालकांनी माणुसकी प्रतिष्ठानचे आभार मानले. यावेळी माणुसकी प्रतिष्ठानचे  सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.