
कणकवली : कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाज सेवा मंडळ, कणकवलीतर्फे तालुक्यातील कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण ज्ञातीतील २०२४/२५ या शैक्षणिक वषार्तील गुणवंतांचा गौरव सोहळा १३ जुलै रोजी दुपारी ३. वा. संस्थेच्या फोंडाघाट येथील 'पूणार्नंद भवन' येथे आयोजित करण्यात आला आहे. यात २०२५ मध्ये झालेल्या दहावी परीक्षेत ८० टक्के व त्यापेक्षा अधिक व बारावी परीक्षेत ७० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
पदवी व पदव्युत्तर परीक्षेत ६० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या आणि सर्व स्पर्धात्मक, एनटीएस, - एमटीएस, बीडीएस, आॅलिंम्पियाड इत्यादी परीक्षेत तालुक्यात प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणाºया गुणवंतांसह कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात व शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत पाचवी व आठवीत २१० व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करून विशेष प्राविण्य संपादित केलेल्या गुणवंतांचाहीं गौरव होणार आहे. तसेच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक व कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाºया व पुरस्कार प्राप्त ज्ञाती बांधवांचा सत्कार संस्थेतर्फे करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक व सर्व ज्ञाती बांधवांनी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. तालुक्यातील ज्ञातीतील गुणवंतांनी गुणपत्रिकांच्या छायांकित प्रती ३ जुलैपर्यंत संस्थेच्या पदाधिकाºयांकडे द्याव्यात. तालुक्यातील ज्ञातीतील गुणवंतांनी गुणपत्रिकांच्या छायांकित प्रती ३ जुलेपर्यंत संस्थेच्या पदाधिकाºयांकडे द्याव्यात. अधिक माहितीसाठीसाठी राजू गवाणकर, रामचंद्र बावकर, राजेश आजगावकर, अरुण सामंत, प्रथमेश महाजन यांच्याशी संपर्क साधावा.