
मालवण : मालवण तालुक्यातील मौजे वायरी तारकर्ली देवबाग प्रजिमा २८ हा प्रमुख मार्ग आहे. या मार्गावर भूमिगत विद्युत वाहिनी काम करताना रस्त्याची खोदाई करण्यात आली आहे, यामुळे या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत खराब झाला आहे. यामुळे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अपघात घडत आहेत.
त्यामुळे लवकरात लवकर हे खड्डे डांबरीकरण किंवा कॉक्रीटीकरण करून सुस्थितीत करण्यात यावेत. अन्यथा त्या ठिकाणी हे खड्डे त्वरित न बुजवल्यास या ठिकाणी झाडे लावा झाडे जगवा आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छेडण्यात येईल असा इशारा तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिला आहे.