कोळंब गावातील 4 जि. प. शाळांना संगणक भेट

मिलिंद कांदळगावकर यांचा पुढाकार
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: May 27, 2025 11:58 AM
views 157  views

मालवण : कोळंब गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद कांडकर यांच्या पाठपुराव्यातून नॅशनल युनिएन ऑफ सी फेअर्स ऑफ इंडिया या संस्थेचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी आपल्या संस्थेमार्फत कोळंब गावातील 4 जिल्हा परिषदेच्या शाळांना अँडव्हान्स संगणक मोफत भेट दिली. त्यामध्ये कोळंब नंबर1शाळा, कोळंब कातवड, न्हिवे शाळा आणि कातवड खैदा या शाळांचा समावेश आहे. 

जिल्हा परिषद शाळेतील मुलांना दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी तसेच अध्ययन अध्यापनात तंत्र ज्ञानाचा प्रभावी वापर केला जावा व्यासाठी आपली संस्था सतत प्रयत्नशील आहे आणि म्हणूनच असे शैक्षणिक व सामाजिक नवनवीन उपक्रम आपल्या संस्थने हाती घेतले आहे. असे NUSI या संस्थेचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी सांगितले. सदर संगणक वाटप कार्यक्रम सर्जेकोट शाळेत पार पाडला. त्यावेळी NUSI या संस्थेचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी कोळंब गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद कांडरकर हे शैक्षणिक, सामाजिक कार्यात करत असलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले.

यावेळी संस्थेचे सरचिटणीस मिलिंद कांदळगावकर, कोळंबमधील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद कांडरकर ,सर्जेकोट माजी सरपंच दाजी कोळंबकर, कोळंब ग्राम पंचायत सदस्य मंगेश चव्हाण, कोळंब कातवड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेंद्र बागवे, सर्जेकोट शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पराडकर, कोळंब शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष श्रीम. गांगनाईक, न्हिवे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीम. पाताडे, तसेच कोळंब ग्रामस्थ विद्याधर कोळंबकर, सर्व पाच शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक,ग्रामस्थ, स्थानिक पालकवर्ग, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक ग्रामस्थांनी आणि शिक्षणप्रेमींनी या उपक्रमाचे स्वागत केले.