प्राथ. शिक्षक पतपेढीच्या अध्यक्षपदी चंद्रसेन पाताडे

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: May 15, 2025 18:11 PM
views 81  views

सिंधुदुर्गनगरी :  सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरी या संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रसेन कृष्णा पाताडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

संस्थेच्या सिंधुदुर्गनगरी येथील प्रधान कार्यालयात  अध्यासी अधिकारी सहायक उपनिबंधक कुडाळ सुनील मरभळ यांचे उपस्थितीत पार पडलेल्या सभेत चंद्रसेन पाताडे यांची बिनविरोध निवड संचालक मंडळाने केली. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा ऋतुजा जंगले, संचालक सर्वश्री संतोष मोरे, नारायण नाईक, संतोष राणे, संजय पवार, श्रीकृष्ण कांबळी, सीताराम लांबर, मंगेश कांबळी, सचिन बेर्डे, महेंद्र पावसकर, समीक्षा परब, तज्ज्ञ संचालक किशोर कदम, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी समीर नातू, अकौंटट मनोज सावळ, संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

चंद्रसेन पाताडे हे शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी विविध संस्थांवर कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीनंतर संघटना पदाधिकारी राजन कोरगावकर, भाई चव्हाण, विठ्ठल गवस, तुषार आरोसकर, दादा जांभवडेकर, सुरेखा कदम, निकिता ठाकूर, नंदकिशोर गोसावी, प्रशांत मडगावकर, संतोष कुडाळकर, रफीक बोबडे, सुगंध तांबे, किशोर गोसावी, विनायक जाधव, ईश्वरलाल कदम, गोपाळ गावडे, दिनेश जंगले, प्रवीण ठाकर, तालुका पदाधिकारी विवेकानंद कडू, सुशांत मर्गज, निलेश ठाकूर, शशांक आटक, महेश गावडे, शैलेंद्र न्हावेलकर, राजेंद्रप्रसाद गाड, नंदकिशोर पाडगावकर, प्रसाद जाधव,महेश काळे, हेमंत सावंत, आप्पा सावंत, संतोष तेरसे, श्रीकृष्ण सावंत, प्रदीप सावंत, मालवण गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, सामाजिक संघटना पदाधिकारी सुजित जाधव, संजय कदम, नितीन पवार, कृष्णा पाताडे, भाऊ पाताडे, सुनील पाताडे, दीपक पाताडे, विजय पाताडे, मनोहर पाताडे, प्रसाद पाताडे, नितीन पाताडे, ललित पाताडे, अमित चव्हाण, रत्नागिरी शिक्षक पतसंस्थेच्या संचालिका प्रांजली धामापूरकर, दीपक धामापूरकर आदी मान्यवरांनी शिक्षक पतपेढीत उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

आपल्यावर दिलेली जबाबदारी प्रामाणिक व सचोटीने पार पाडून संस्थेचा नावलौकिक अधिक उंचावण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहणार तसेच संस्थेचे व मालक सभासदांचे हित जोपासण्यासाठी कटिबद्ध राहणार असे प्रतिपादन यावेळी श्री.पाताडे यांनी केले.