
दोडामार्ग : पणतूर्ली राऊळवाडी येथील श्री सातेरी देवी पंचायतन देवस्थानचा पुनः प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा बुधवारी 14 मे रोजी चौथ्या दिवशी होम पिठदेवता हवन, शिखर प्रतिष्ठा, कलशारोहण मुख्यदेवता प्रतिष्ठापन सत्व देवतांना चढवून प्राणप्रतिष्ठा ब्राह्मण, गावकरी व यजमान तसेच अंधार कूडींच्या सहाय्याने ढोल ताशाच्या गजरात भक्तांच्या जनसागरात श्री सातेरी देवी पंचायतन मंदिराचा कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा दिमाखात पार पडला.
बुधवारी 14 मे रोजी चौथ्या दिवशी सकाळी 08 वाजता मंडप देवता पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. देवाला सांगणे करून अंधार कुडी उभी करण्यात आली. अंधार कुडींच्या सांगण्यावरू मंदिरात ठेवलेले कलश ढोलताशाच्या गजरात मंदिरात भोवती प्रदक्षिणा काढणून गावकरी व अंधार कुडी क्रेन मध्ये चढून कलश मंत्र जपाने कलशारोहण कार्यक्रम करण्यात आला. त्या नंतर मुख्य देवताव प्रतिषष्ठापन करून सत्व देवताना चढवून प्राणप्रतीष्ठा करण्यात आली. त्या नंतर महापूजा पूर्णाहुती करून मंदिरा भोवती तीनवेळा प्रदक्षणा घालण्यात आली.
दुपारी 01.30 वाजता महापूजा पूर्णाहुती झाल्या नंतर देवतांना वस्त्र परिधान करून आरती करण्यात आली. त्या नंतर गाऱ्हाणे घालण्यात आले. त्या नंतर देवाला नैवेद्य दाखविल्या नंतर महाप्रसादाला सुरवात करण्यात आली. यावेळी भाविक जनसागर उसळला होता. गोवा, कर्नाटक, सिंधुदुर्ग तसेच मुंबई आदी ठिकाणाहून भाविक मोठ्या संखेने दर्शनासाठी आले होते. माहिला पुरुषांनी एकाच रंगाची वस्त्र परिधान करून सोहळ्याची शोभा वाढविली.
कलशारोहण सोहळा च्या शेवटच्या म्हणजे चौथ्या दिवशी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चोख नियोजन देवस्थान कमिटीने केल. वाहने नियजन बद्ध पद्धतीने लावण्यासाठी गावातील तरुणांनी मेहनत घेतली. तसेच मंदिरात मध्ये रांग लावून महिलांनी देवींची ओटी भरली. . हे सर्व नियोजन व्यवस्थित पार पाडण्यासाठी श्री सातेरी पंचायतन देवस्थान समिती पणतुर्ली राऊळ वाडी चे अध्यक्ष सुनील गवस यांनी सर्वांना विश्वासात घेऊन व्यवस्थापन केल. यातून गावाची एकजूट दिसून आली.