
वैभववाडी : खांबाळे येथील श्री ब्राह्मणदेव आदर्श विकास महामंडळ मधलीवाडी यांच्यावतीने श्री ब्राम्हणदेव देवालय येथे रविवारी दि. ११मे रोजी सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने सकाळी ९वा सत्यनारायण पूजा, दुपारी १२वा.महाआरती, दु.१वा. महाप्रसाद, सायंकाळी ४वा.हळदीकुंकू समारंभ, रात्री ८ वा.बुवा संजय शांताराम पवार यांचं सुस्वर भजन, रात्री ९.३०वा. बुवा विनोद चव्हाण विरुद्ध बुवा संजय पवार यांचा पारंपरिक भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे.
तसेच या कार्यक्रमानिमित्त लकी ड्रॉ ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून विविध बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.