
सावंतवाडी : विलवडे येथील माऊली कला आणि क्रीडा मंडळ प्रस्तुत, 'वस्त्रहरण' फेम लेखक गंगाराम गवाणकर लिखित आणि परेश धर्णे दिग्दर्शित 'वडाची साल पिंपळाक' हे दोन अंकी विनोदी नाटक शनिवार, १० मे रोजी रात्री ८.३० वाजता विलवडे शाळा नं. १ च्या रंगमंचावर होणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.