श्री कुलदेवता बंडवसाचा पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा

Edited by: विनायक गांवस
Published on: May 09, 2025 11:31 AM
views 39  views

सावंतवाडी : आंबोली नजीक गेळे डुरेवाडी येथे श्री कुलदेवता बंडवसाचा पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा शुक्रवार, ९ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमानुसार, सकाळी ७ वाजता बंड परिवार मूळपुरुष (पूर्वज) नुतन स्मृतिस्थळाचे उद्घाटन व पूजन होणार आहे. त्यानंतर सकाळी ९:३० वाजता श्री कुलदेवता प्रतिमांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल. सकाळी १० वाजता मंदिरामध्ये प्रतिमांची प्राणप्रतिष्ठापना व होम हवन विधी पार पडेल.

दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम होईल, तर रात्री ८:३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. रात्री १० वाजता पौराणिक दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.

समस्त बंड परिवार यांच्यावतीने सर्व भाविकांना या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे नम्र आवाहन करण्यात आले आहे.