
देवगड : देवगड तालुक्यातील साळशी येथील विविध विकास कामांचे लोकार्पण भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायण राणे यांच्या विकास निधीतून साळशी चाफेड मुख्य रस्ता ते देवणेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण यासाठी 20.लाख. रुपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या शिफारसी मधून 25/15 मधून चाफेड मुख्य रस्ता ते साळशी सरमळेवाडी रस्ता 7.लाख. रुपये मंजूर झालेत. या विकास कामांचे लोकार्पण आज भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष नार्वेकर आणि भाजपा जिल्हा पदाधिकारी मंगेश लोके यांच्या हस्ते पार पडले. देऊ तो शब्द पूर्ण करू या उक्तीप्रमाणे साळशी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देण्यात आला.
त्यामुळे ग्रामस्थांनी पालकमंत्री नामदार नितेश राणे खासदार नारायण राणे यांचे आभार मानले. यावेळी माजी सरपंच सत्यवान सावंत, वैभव साळसकर, किशोर साळसकर, माजी उपसरपंच राजेंद्र साटम, महेश गावकर, आकाश राणे, प्रवीण राणे, सुहास राणे, विठोबा रावले, सत्यवान भोगले, उषा रावले, उमेश रावले, यशवंत लाड, प्रकाश रावले इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लागत असल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तसेच भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठाम पणे राहण्याचे अभिवचन दिले आहे.