
वैभववाडी : भुईबावडा शिमगोत्सवातील म्हानांड (सरता खेळ ) उत्सव शनिवार दि. २९मार्च रोजी होणार आहे.या कार्यक्रमाने शिमगोत्सवाची सांगता होणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने या उत्सवाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
तळ कोकणातील प्रसिद्ध शिमगोत्सव असणाऱ्या भुईबावडा गावचा म्हनांड हा उत्सव शनिवारी होत आहे. या उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या उत्सवापुर्वी दि२८ मार्च रोजी देवाच्या परवानगीने(कौलाने मानकरी मंडळीचा ओटी भरणे कार्यक्रम होणार आहे. तसेच याच दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.त्यानंतर दुसऱ्या दिवशी २९ला.म्हानांड हा उत्सव होणार आहे. या दिवशी रात्री लळीत खेळ, पालखी मिरवणूक आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.