
देवगड : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेस ॲस्ट्रॉनॉमी किट-१ सेट प्राप्त झाला आहे. अहमदनगर येथील मे.नगर इंडस्ट्रीजने दिलेल्या भूगोल विषयाशी संबंधित किट मध्ये (१) स्टार डायल (२) वाईंड वेन (३) कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष मॉडेल (४) टाईम झोन इंडिकेटर (५) टाईम झोन पझल (६) फेजेस ऑफ मून (७) डे अँड नाईट (८) सोलर सिस्टीम इक्लिप्स (९) सीझन मॉडेल (१०) अर्थ राऊंड ग्लोब (११) टेलिस्कोप ॲस्ट्रोनॉमिकल (१२) डिजिटल जिऑग्राफिकल इमेजेस इ.मॉडल चा समावेश आहे.
हे मॉडेल भूगोल विषय शिक्षकांना संकल्पना स्पष्ट करून देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव यांनी जिल्हा नियोजन अधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना धन्यवाद दिले आहेत.