युवासेनेच्या भिंगळोलीतील कार्यालयात जनता दरबार

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या घोषणेची अंमलबजावणी
Edited by: मनोज पवार
Published on: March 26, 2025 17:10 PM
views 72  views

मंडणगड :  गृहराज्य मंत्री आमदार योगेश कदम यांनी तालुक्याचे नुकत्याच केलेल्या दौऱ्यात देव्हारे येथे केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करत 26 मार्च 2025 रोजी भिंगळोली येथील युवासेनेच्या कार्यालयात तालुक्यातील नागरीकांचे प्रशासकीय यंत्रणेशी संबंधीत प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार आयोजीत करण्यात आला होता. यापुढील काळात दर बुधवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे.

जनता दरबारास आमदार योगेश कदम यांचे मतदार संघातील स्विय सचिव प्रविण मोरे हे दर बुधवारी उपस्थित राहून  नागरीकांच्या तक्रारी स्विकारणार आहेत या संदर्भातील कार्यवाहीचा फिड बँक व फोलॉअप स्थानीक कार्यकर्ते करणार असून याचा पुर्ण अहवाल आमदार योगेश कदम यांना दिला जाणार आहे. (26) रोजी आयोजीत जनता दरबारास प्रविण मोरे, दत्ता क्षीरसागर, तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, युवासेना प्रांत कार्यकारिणी सदस्य चेतन सातोप, माजी जि.प. सदस्या अस्मिता केंद्रे, विभागप्रमुख इरफान बुरोंडकर, सिध्देश देशपांडे, प्रतिक पोतनीस यांच्यासह तालुक्यातील शिवसैनीक व युवासैनिक उपस्थित होते यावेळी तालुक्यातील नागरीकांनी महसुल विभाग पंचायत समिती पाणी पुरवठा विभागासह विविध शासकीय कार्यालयांशी संबंधीत वैयक्तीक व सार्वजनीक समस्या मांडल्या त्या सोडवण्यासाठी जनता दरबाराचे माध्यमातून प्रत्यक्ष कार्यवाही सुध्दा सुरु करण्यात आली. 

युवासैनिकांची मागणी पुर्ण जनतेस उत्तम पर्याय मिळाला चेतन सातोपे- भिंगळोली येथील युवासेनेच्या कार्यालयात नागरीकांच्या समस्या सोडवणारी व्यवस्था असावी अशी युवा सैनिकांची मागणी होती ती गृहराज्य मंत्र्यांनी आज खऱ्या अर्थाने पुर्ण केली आहे. तालुक्यातील नागरीकांनी या संधीचा लाभ घेऊन प्रशासकीय यंत्रणांशी संबंधीत आपल्या समस्या व अडचणी सोडवून घ्याव्यात असे आवाहन युवासेना प्रांतकार्यकारिणी सदस्य चेतन सातोपे यांनी यावेळी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रीयेत केले आहे. आमदार योगेश कदम यांच्याकडे पाच खात्यांचा कारभार असल्याने मतदारसंघातील सर्व तक्रीरांकडे वैयक्तीक रित्या लक्ष देणे शक्य होणार नसल्याने ही पर्यायी व्यवस्था तयार करण्यात आली आहे शिवसेना, युवासेना, व सर्व आघाड्यांचे प्रमुख कार्यकर्ते जनता दरबारातील सर्व तक्रारींचा पाठपुरावा करणार आहेत व समस्यांचा निपटारा कऱणार असल्याचे सांगीतले जनता दरबारीतील सर्व कामकाजाचा मंत्री महोदय घोषवारा घेणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले. तालुक्यातील नागरीकांनी दर बुधवारी भरणाऱ्या जनता दरबाराचे लाभ घ्यावा असे आवाहन या निमीत्ताने केले आहे.