
खरवते : शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते-दहिवलीमधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयामधील प्रक्षेत्रावर विविध फुलांची व्यावसायिक दृष्टिकोन ठेवुन लागवड करण्यात आली आहे. अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत या विद्यार्थ्यांकडून झेंडु, अस्टर, गुलछडी ई. फुलांची लागवड करण्यात आली आहे. कृषि क्षेत्रामध्ये ईतर पिकांपासोबतच फुलशेतीचे ही अनन्य साधारण महत्त्व आहे.
कोकणामध्ये फुल शेती तशी दुर्मिळच. कोकणातील हवामान हे या शेतीसाठी खुप पोषक असुन योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास याधुनही भरघोस उत्पादन घेता येवु शकते व फुलशेती हा एक समक्ष व्यवसाय होवु शकतो हा दृष्टीकोन समोर ठेवुन या विद्यार्थ्यांकडून पिवळा व भगवा झेंडु , अॅस्टर व गुलछडी ई.ची लागवड करण्यात आली .सुमारे 10 गुंठे क्षेत्रावर 60×60 से.मी अंतरावर व 16 वाफयांमध्ये ड्रीम यललो व कलकत्ता जंबो या जातीच्या झेंडुची लागवड करणयात आली आहे. तसेच 3 गुंठे क्षेत्रावर 6 वाफयांमधये अॅस्टर ची व सुमारे 2 गुंठे क्षेत्रावर गुलछडी ची लागवड करण्यात आली आहे. या सर्व फुलांसाठी विद्यार्थ्यांकडून उत्तम खतांचे व आवश्यक मूलद्रव्ये यांचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. यामध्ये 19:19:19 हे रोपांच्या वाढीसाढी, ह्युमिक अॅसिड हे रोपांच्या मुळांच्या वाढीसाठी, 13: 40: 13 हे कळ्यांच्या वाढीसाठी व 13: 00:45 हे मूलद्रव्य फुलांचे वजन वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून देण्यात आले आहे. या मधुन आतापर्यंत या विद्यार्थ्यांना सुमारे 700 कीलो झेंडू, 70 कीलो अॅस्टर व 30 कीलो गुलछडीचे उत्पादन मिळाले आहे. नुकत्याच होत असलेल्या शिमगोत्सव सणासाठी पंचक्रोशीतील सर्व गावांमधुन या विद्यार्थ्यांच्या फुलांना प्रचंड मागणी आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून बनवण्यात येणारे फुलांचे हार व गुच्छ यांनीही मागणी वाढत आहे.
आतापर्यंत या विद्यार्थ्यांकडून दोन महिन्याच्या कालावधीत मध्ये 390 फुलहार विकण्यात आले आहेत तसेच सावर्डे आठवडी बाजारातही या फुलांना उत्तम मागणी आहे. सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम यांनी या विद्यार्थ्यांच्या प्रक्षेत्रावर भेट दिली. या विद्यार्थ्यांचे कौतुक केले या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील, उद्यानविद्या विभाग प्रमुख प्रा.स्मिता जाधव व प्रकल्प अधिकारी प्रा. अंकीता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.