मंडणगड विकास मंडळाची सहविचार सभा उत्साहात

Edited by: मनोज पवार
Published on: March 26, 2025 16:53 PM
views 127  views

मंडणगड :  मंडणगड तालुका विकास मंडणगड एफ 428 या संस्थेच्या सहविचार सभेचे शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 23 मार्च 2025 रोजी आयोजन करण्यात आले होते. सभेचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष आमदार भाईसाहेब जगताप कार्यकारी अध्यक्ष दिलीप जगताप, उपाध्यक्ष रमेश दळवी, सरचिटणीस अॅड. विनोद दळवी, चिटणीस संतोष मांढरे, अॅड.अभिजित गांधी, खजिनदार विलास मालुसरे, सहखजिनदार मिलिंद धोत्रे संस्था सदस्य श्रीपाद कोकाटे, राकेश शिंदे, मुश्ताक मिरकर, सौ.अस्मिता केंद्रे यांची उपस्थिती लाभली. संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष दिलीप जगताप यांची सभेच्या अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली.

महाविद्यालयाचे प्राचार्य आबासाहेब हुलगे यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष भाई साहेब जगताप यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्राचार्य आबासाहेब हुलगे यांनी प्रारंभी या शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीबद्दल थोडक्यात मत मांडले. यानंतर भाईसाहेब जगताप यांनी विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्या समस्या जाणून घेतल्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना त्यांनी शालेय इमारत व इतर भौतिक साधनसुविधा यांच्याबाबत सुधारणा अग्रक्रमाने करण्यात येईल असे सांगितले. संस्था पदाधिकारी,पालक,शिक्षक, विद्यार्थी या सर्वांनी मिळून शाळेच्या भौतिक सुख साधन सुविधेचा विकास केला पाहिजे असे विचार मांडले. अध्यक्ष  दिलीप जगताप यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये सांगितले की आम्ही सर्व पदाधिकारी या शाळेच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत.

अन्य सर्व पदाधिकारी रमेश दळवी, विनोद दळवी, अॅड.अभिजित गांधी यांनी सुद्धा आपल्या मनोगतामध्ये या संस्थेविषयी आदरभाव व्यक्त केला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य अर्जुन हुल्लोळी, पर्यवेक्षक शांताराम बैकर, संस्थेच्या अन्य चारी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते. सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बजरंग गावडे यांनी केले.