
वेंगुर्ले : आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २९० गावांमध्ये पोलिसांमार्फत जनसंवाद हा उपक्रम राबवला आहे. आपल्याला कोणीही फुकट पैसे देत नाही त्यामुळे सायबर क्राईम करणाऱ्या गुन्हेगारांच्या प्रलोभनाला बळी पडू नका. यासंबंधी कोणतीही अडचण असल्यास तात्काळ १९३० या नंबरला संपर्क करा. आपल्या गावात कोणीही अंमली पदार्थ, गांजा, चरस याची विक्री करत असेल तर तात्काळ पोलिसांना याची माहिती द्या यामुळे तरुण पिढी बरबाद होण्यापासून वाचू शकते असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांनी तुळस वाघेरी येथे बोलताना केले.
सिंधुदुर्ग पोलीस दला मार्फत सध्या जिल्ह्यात सुरू असलेला जनसंवाद कार्यक्रम अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांच्या प्रमुख उपस्थितीत तुळस वाघेरी येथे घेण्यात आला. यावेळी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक संदीप भोसले, तुळस सरपंच रश्मी परब, उपसरपंच सचिन नाईक, ग्रा प सदस्य जयवंत तुळसकर, चरित्रा परब, स्वाती सावंत, मयुरी बरागडे, नारायण कोचरेकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष शेटकर, माजी सरपंच शंकर घारे, विजय रेडकर माजी ग्रा प सदस्य शीतल नाईक, संजना परब, शेखर तुळसकर, भाजप महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, रामू परब, शिवसेना विभागप्रमुख संजय परब, वैभव होडावडेकर, आंनद तांडेल यांच्यासहित ग्रामस्थ तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदेश कुबल, पोलीस हवालदार विशेष भगत, बिट अंमलदार दीपा मठकर, पोलीस कॉन्स्टेबल बंटी सावंत, जयेश सरळमळकर, पोलीस हवालदार अनुपकुमार खंडे, पोलीस पाटील सागर सावंत, लीना राऊळ, मनोज होडावडेकर, स्वप्नाली सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना अमली पदार्थ विरोधी चित्रफीत, डायल 112 बाबत चित्रफीत दाखवून याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी तुळस गावात भेडलेमाड तोडणाऱ्यांची संख्या वाढली असून बांदा येथून हे रॅकेट चालत असल्याचे सांगितले व यावर बंदी घालण्याची मागणी केली. यावर रावले यांनी अशा भेडलेमाड तोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा व चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच गावात येणाऱ्या भंगारवाल्यांची चौकशी करण्याची मागणी केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शीतल नाईक, आभार विजय रेडकर यांनी मानले. यावेळी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका महिला, जेष्ठ नागरिक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.