
देवगड : फोंडा हरकुळ तेलीवाडीतील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम रामा खानविलकर, वय ७७ ) यांचे बुधवार दि. १२ फेब्रु. रोजी सकाळी अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले. ते 'बुधाजी आबा' या नावाने सुपरिचित होते. त्यांना सामाजिक क्षेत्राची खूप आवड होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, दोन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गावच्या सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असायचा. कुणाच्याही प्रसंगाला ते नेहमी धाऊन जायचे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सुप्रसिद्ध भजनी बुवा राजेंद्र खानविलकर यांचे वडील तर पत्रकार संतोष साळसकर यांच्या भावाचे ते सासरे होत.