
चिपळूण : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अर्धवट राहिले आहे. अजूनही बांधकाम पूर्ण होत नाही. त्यामुळे प्रवाशी वर्गाला उन्हात उभे रहावे लागते. यासाठी सुस्थितीत झालेल्या स्लॅब खाली समोरचे पत्रे काढून प्रवाशांना बसण्याची व उभे राहण्याची सोय करून द्यावी अन्यथा १ मार्च रोजी चिपळूण काँगेस पक्ष आणिं कष्टकरी शेतकरी संघटना आंदोलन करेल आणि वेळ आलीच तर फौजदारी गुन्हे दखल करू असे काँग्रेसचे अशोक जाधव यांनी आगार व्यवस्थापकांना सुनावले आहे.
याच पार्श्वभूमीवर त्यांनी ६ फेब्रुवारी रोजी निवेदन दिले होते. त्यात त्यांनी नमूद केले होते की, बसस्थानक इमारतीचे बांधकाम पहिल्या स्लॅब पर्यंत झाले आहे. किमान सुस्थितीत झालेल्या स्लॅब खाली प्रवाशांना बसण्याची व उभे राहण्याची सोय समोरचे पत्रे काढून करावी असे निवेदनात म्हटले होते. यावर दोन दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन अशोक जाधव, काँग्रेस आणि शेतकरी कष्टकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता झाली की नाही हे पाहण्यासाठी पुन्हा आढावा घेण्यासाठी ११ फेब्रुवारी रोजी पाच दिवसानी अशोक जाधव आणि शिष्टमंडळाने अल्पेश मोरे , शिवाजी पवार , राजेशजी मुल्ला, बशिर बेबल, समीर रेडीज, आशिश कुंभार यांनी प्रत्यक्ष डेपो मॅनेजर दीपक चव्हाण यांचे समवेत पाहणी केली. तेंव्हा काहीच कार्यवाही न झाल्याचे निदर्शनास आले.
शेवटी संतापून आढावा बैठकीत अशोक जाधव यांनी इशारा दिला की, दिवसेंदिवस उन्हाळा वाढत आहे. स्त्रीया , लहान मुले, वृध्द, आजारी व्यक्ती , विध्यार्थी या सर्वांना एसटीसाठी उन्हात उभे राहावे लागते. त्यातच होळीचा सण जवळ आला आहे. चिपळूण हे मध्यवर्ती गर्दीचे एस टी स्टँड आहे. सातत्याने मागणी आणि आंदोलनने करुनही महामंडळाला आणि सरकारला जाग येत नसेल आणि झालेल्या स्लॅब खाली प्रवाशांना सावलीत बसण्यासाठी स्वच्छ आणि मोकळी जागा करून दिली नाही तर १ मार्च रोजी सदर पत्रे काढून प्रवशांना जागा करून देण्यात येईल. यासाठी आंदोलन काँग्रेस आणि शेतकरी कष्टकरी संघटना करेल याची नोंद घ्यावी असे त्यांनी सुनावले आहे. महामंडळाच्या डी सी . कार्यकारी अभियंता , चिफ इंजिनीअर यांना समोरची पार्टी करून वेळ आली तर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे अशोक जाधव यांनी सांगितले .